Top Banner

Previous Next

शेतकऱ्याचे नाव :- श्री. लव किशोर दर्डा

पत्ता व मो. क्र. :- मौजा भारी ता. जिल्हा यवतमाळ

शेतकऱ्याचे नाव :- श्री. लव किशोर दर्डा

पत्ता व मो. क्र. :- मौजा भारी ता. जिल्हा यवतमाळ मो . न . ८८८८८७४६६६

पिकांचे नाव :- विषमुक्त भाजीपाला व फळबाग लागवड

अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण

यवतमाळ - नागपूर मार्गावर भारी गावाजवळ त्यांचे १४ एकर शेत आहे. ही शेतजमीन पूर्वी पडीक होती. डॉ.लव दर्डा यांना ही शेती सुस्थितीत आणण्यासाठी सहा महिने ते वर्षभराचा कालावधी लागला. प्रचंड परिश्रमाच्या जोरावर त्यांनी ही शेती पेरणीयोग्य केली. याठिकाणी पाण्याचाही प्रश्न होता. याही समस्येवर मात करत त्यांनी ५० बाय ५० चे शेततळे निर्माण केले. हे शेततळे २० फूट खोल आहे. यात ९० लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. हे शेततळे पावसाच्या पाण्यासह बोअरच्या माध्यमातून भरले जाते. या पाण्याचा मार्च ते मे महिन्यापर्यंत शेतीपीकासाठी वापर होतो. या शेतीत प्रथम त्यांनी विषमुक्त भाजीपाला घेतला. सात एकरात सीताफळ लावले. त्यात चार एकर एनएमके-१ गोेल्ड जातीचे सीताफळ आहे. या जातीच्या एका सीताफळाचे वजन अर्धा किलो आहे. याची क्षमता विदेशात निर्यात करता येईल एवढी आहे. यासोबतच तीन एकर क्षेत्रात पेरूची लागवड केली. यात एक एकर व्ही.एन.आर. जातीचा पेरू आहे, तर दोन एकर लखनऊ पेरू आहे. डॉ.लव दर्डा यांनी अर्धा एकरात पॉलीहाऊस उभारले आहे. त्यात लाल आणि पिवळ्या रंगाची शिमला मिरची उत्पादित करण्याचे काम त्यांनी हाती घेेतले आहे. ही मिरची मुंबई, दिल्ली, बंगळूरू आणि नागपूरपर्यंत जाते. याशिवाय उन्हाळयात याच पॉलीहाऊसमध्ये काकडीचे उत्पादनही ते घेतात. यात बेडसह मल्चिंग पेपरचा वापर त्यांनी केला आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता: गार्डन रोड, एल. आ. सी. चौक, यवतमाळ, जि.- यवतमाळ पिन कोड- ४४५००१
ई-मेल: dsaoytl@gmail.com
संपर्क: (07232)245338

Whats App QR Code