पत्ता व मो. क्र. :- मौजा दोनोडा ता. कळंब जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्याचे नाव :- श्री. माणिकराव कदम पत्ता व मो. क्र. :- मौजा दोनोडा ता. कळंब जिल्हा यवतमाळ मो . न .७७७३९६५६५९
पिकांचे नाव :- तूर लागवड
अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा थोडक्यात विवरण
मी माणिकराव कदम राहणार दोनोडा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ येथील असून माझ्याकडे एकूण सहा एकर कोरडवाहू शेती आहे. परंतु याच शेतीमध्ये कोणताही नकारात्मक भावनेने न पाहता सकारात्मक पाहत एक नवा प्रयोग केला आहे. या शेतीमध्ये तूर लावण्याचा निर्णय घेतला विविध शेतीचा अभ्यास करून आपली एक खास पद्धत विकसित केली ती पद्धत म्हणजे लागवड करताना तुरीच्या दोन तासांमध्ये सहा फूट एवढा अंतर ठेवलं तर दोन झाडांमध्ये दोन फुटाचे अंतर ठेवले यामध्ये कोणताही आंतरपीक घेतले नाही. वेळोवेळी फक्त चार फवारण्या दिल्या आणि आचार्य तुरीचा पिक भरून आल. पाहता पाहता त्यांच्या शेतातील तुरीच्या एका एका झाडाला दोन ते तीन हजार शेंगा लागल्या अगदी दोन टक्के रोगही वगळता 90% प्रयोग यशस्वी झाला. यातून मला किमान दहा क्विंटल तुरीचे उत्पादन मिळाले आहे विशेष म्हणजे दाण्यांना सुद्धा कीड लागली आहे नसून अगदी निरोगी व ठसठशीत भरले आहे. यासाठी मला एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च आला यातून सगळा खर्च वजा जाता एकरी 40 हजार रुपये नफा मिळाला आहे.