पत्ता व मो. क्र. :- मु .पो पिंपरी दुर्ग ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्याचे नाव :- श्री. अभिषेक इंगोले
पत्ता व मो. क्र. :- मु .पो पिंपरी दुर्ग ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ मो . न .७३७८४३३९०१
पिकांचे नाव:- कलिंगड व खरबूज लागवड
अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण
मी अभिषेक इंगोले प्रगतशील शेतकरी रा.पिंपरी दुर्ग ता. राळेगाव जि यवतमाळ यांनी यांच्याकडे एकूण २५ एकर शेत जमीन असून खरीप हंगाम-२०२० मध्ये कपासी,तूर, सोयाबीन या पिकाची लागवड केली होती. तसेच रब्बी हंगाम २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये दोन एकर क्षेत्रावर टरबूज या पिकाची कुंदन, विशाल,आरोही,सरस्वती,मन्नत या टरबूज जातीची लागवड केली होती, लॉकडाऊन मुळे उत्पादित केलेले टरबूज विक्री करण्याकरिता अडचणी येवून शेतमालाचे नुकसान होत होते, यावर मात करण्यासाठी. महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांनी विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत प्रगतशील शेतकरी श्री.अभिषेक इगोले यांनी उत्पादित केलेले टरबूज कोरोना काळात थेट ग्राहकापर्यंत विक्री करणेबाबत त्यांना प्रोत्साहित केले, तसेच कोरोना काळात महाराष्ट्र शासन कृषि विभागाकडून परवानगी घेऊन त्यांनी यवतमाळ येथे विक्री स्टॉल एप्रिल २०२१ पासुन प्रारंभ केले. शहरात टरबूज ची विक्री करून दोन महिन्यात अंदाजे रुपये १,४०,००० /. ते १,६०,००० /. पर्यंत निव्वळ नफा कमवला.