पत्ता व मो. क्र. :- मु .वाढोना बाजार पो.वडकी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ
शेतकऱ्याचे नाव :- श्री. उमेश अंबादास झाडे
पत्ता व मो. क्र. :- मु .वाढोना बाजार पो.वडकी ता. राळेगाव जिल्हा यवतमाळ मो . न .९८२२५७४६९९
पिकांचे नाव :- द्राक्ष लागवड
अवलंब केलेली वैशिष्ट्यपूर्ण / नाविन्यपूर्ण /आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब थोडक्यात विवरण
मी उमेश अंबादास झाडे प्रगतशील शेतकरी रा. वाढोना बाजार पो.वडकी ता. राळेगाव जि यवतमाळ यांच्याकडे एकूण ०८ एकर शेत जमीन असून खरीप हंगाम-२०२२ मध्ये कपासी,तूर, सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे. तसेच रब्बी हंगाम २०२०-२१ मध्ये ०.५० एकर क्षेत्रावर द्राक्ष या पिकाची सुपर सोनाका या जातीच्या पिकाची राळेगाव तालुक्य मध्ये प्रथमताच लागवड केली असून. द्राक्ष पिकाची कलमे सोलापूर येथून आणण्यात आल्या असून, सदर कलमे लागवड करण्या करिता एकुण रु.७,००,००० खर्च करण्यात आले. सदया स्तीतीत द्राक्ष पिकची लागवड करून २४ महिने पूर्ण झाले असून जानेवारी-२०२३ पासून सदर द्राक्ष पिकापासून अंदाजे १० ते १५.०० कि,लो प्रती झाड या प्रमाणे उत्पादन येण्याची शक्यता आहे. सदर द्राक्ष पिकाची छाटणी, कीड व रोग व्यवस्थापण या विषयाचे सखोल मार्गदर्शन सोलापूर येथील नर्सरी यांचा कडून घेण्यात येत आहे.